आशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश, मुंबई उपनगरातील पशुप्रेमींना दिलासा मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय़

गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास रु. ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज या  पशुबैद्यकीय रुगाणालयाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता जारी केली. उपनगरीतील पाळीव आणि निसर्ग मुक्त पशूंसाठी उत्कृष्ट उपचार व सेवांची सुविधा उभारली जाईल असे प्रतिपादन उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, नव्या इमारतीत तळमजला व तीन मजले असा आराखडा असून सुमारे १०,२१० चौ. मीटर पृष्ठभागातील या रुग्णालयात लहान-मोठ्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक व बहुविध सेवांचा समावेश आहे. उपनगरातील व मुंबईतील विविध भागातील प्राण्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना ही सुविधा मोलाची ठरणार आहे. या प्रकल्पात वास्तुविशारदांची मान्यता, सौरऊर्जा प्रणालीची उभारणी व पर्यावरणपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शासनाच्या या निर्णयामुळे पशुप्रेमी, शेतकरी, रहिवासी व मुंबई महानगरातील अनेकांची जुनी मागणी पूर्ण होत आहे. नव्या मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे प्राण्यांच्या आरोग्यसेवेतील दर्जा आणि उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *