Breaking News

बेलापूरात तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू दोन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले, ढिगाऱ्याखाली शोध घेण्याचे काम सुरु

बेलापूरातील सेक्टर १९ येथील शहाबाज गावात आज पहाटेच्या वेळी एक तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १ एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुर्दैवाने वेळीच मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य सुरु केल्याने दुपारपर्यंत ५५ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सदरची इमारत साधारणतः १० वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे साधारणतः ४.३० वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून क्रॅक झाल्याचा मोठा आवाज आल्याने खालच्या मजल्यावरील आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी शेजारील इमारतीत आसरा घेतला. तोपर्यंत इमारत कोसळून त्याचे रूपांतर ढिगाऱ्यात पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

इमारत कोसळल्यानंतर स्थानिक भागातील काही नागरिकांनी तातडीने पोलिस आणि फायर ब्रिगेडला फोन करून कळविले. या दोन्ही यंत्रणांही आणि एनडीआरएफच्या जवानांना बोलावले. सकाळी दिवस उजाडल्यानतर ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली असून दुपारपर्यंत ५५ जणांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला रूकसार पठाण, लल्लाद्दीन पठाण हे दोघे बेशुध्दावस्थेत पण जखमी असलेले ढिगाऱ्याखाली सापडले. या दोघांना तातडीने नवी मुंबई पालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले की, २०१३ साली सदरची इमारत बांधण्यात आली होती. इमारत कोसळण्याच्या अर्धातास आधीच यातील रहिवाशांनी अर्धा एक तास आधीच इमारतीतून बाहेर धाव घेतली होती.

आम्ही इमारतीतील रहिवाशांची ओळख पटविण्याचे प्रयत्न करत असून बहुतांष रहिवाशी हे एकमेकाशी अनोळखी आहेत. तसेच त्या इमारतीतील नागरिकांना आम्ही तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी केली.

मुख्यमंत्री शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली.

इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महानगरपालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *