मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण १०० आणि ११२ या हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीवर पोहोचता यावे यासाठी घेतल्या गाड्या

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.

About Editor

Check Also

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *