कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीः न्यायालयाचे संजय राऊत यांच्या गैरहजेरीवर खडेबोल पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश

भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला अब्रुनुकसानीप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, राऊतांच्या अनुपस्थितवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अशा शब्दात न्यायालयाने खडेबोल सुनावले आणि सुनावणी शुक्रवारी पुन्हा ठेवली.

दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अपिलावर माझंगाव न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, अपील दाखल करणाऱ्या राऊतांच्या न्यायालयातील अनुपस्थितीवर मेधा सोमेय्या यांच्या वकिलानी आक्षेप नोंदवला. तसेच सुनावणीवेळी अपीलकर्ता हे स्वतः हजर राहणे गरजेचे असल्याचाही युक्तिवाद सोमय्या यांच्या वकीलांनी केला. दंडाधिकाऱ्यांनी राऊतांना जामीन मंजूर केला आहे. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून राऊत पुढील सुनावणीला उपस्थित राहतील, असे राऊतांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

काय आहे प्रकरण

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हटले होते. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता. त्याची दखल घेऊन २६ सप्टेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने राऊतांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. मात्र, निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राऊतांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देऊन त्यांना जामीनही मंजूर केला होता.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *