मंत्रालयाचे कामकाज पुन्हा ५ टक्के कर्मचाऱ्यांवर चालणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोना विषाणूचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे अखेर मंत्रालयाचे कामकाज चालविण्यासाठी १० टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलेली कर्मचाऱी-अधिकाऱ्यांची संख्या पुन्हा ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले.
मुंबई महानगरात, पुणे महानगरात आणि नागपूरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यातच एका कोरोनाबाधीत मंत्र्याने मंत्रालयात येवून सहकारी मंत्र्यांच्या दालनात प्रवेश केला. त्यामुळे त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही निरिक्षणाखाली ठेवण्याची पाळी आरोग्य प्रशासनावर आली. या अशा पध्दतीच्या बेजबाबदारपणामुळे अनेक जण कोरोनाच्या संसर्गात येण्याचा धोका आहे.
तसेच मंत्रालयात येणारे कर्मचारी मुंबई महानगराच्या कोनाकोपऱ्यातून येतात. प्रवासादरम्यान त्यांच्याकडून अथवा इतराकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाईल याची कोणतीही खात्री नाही. त्याचा दुष्यपरिणाम कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलेली संख्या पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार

मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *