निवडणूकीच्या खर्चाच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आयोगाने दिले हे आदेश विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता तर शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित काम पाहत आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

खर्च तपासणीसाठी तारीख :-

१) गुरुवार दि. ७ नोव्हेंबर २०२४

२) बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४

३) सोमवार दि.१८ नोव्हेंबर २०२४

तपासणीचे ठिकाण :- सह्याद्री अतिथीगृह तळमजला बैठक कक्ष मलबार हिल, मुंबई.

तपासणीची वेळ :- सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल.

उमेदवार, प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके, देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन यादव यांनी केले आहे.

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक आहे.

उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याची, नसल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाचीबाब म्हणून गणली जाईल.

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *