माहिती आयोगातील रिक्त पदावर या चार जणांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती राज्यपालांच्या आदेशान्वये मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून चार जणांची नियुक्ती केली

राज्य माहिती आयोगातील चार माहिती आयुक्तांचे पद रिक्त होते. या पदांवर चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राज्याच्या मुख्य आयुक्त पद रिक्त होते. त्यावर राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य मुख्य आयुक्त पदी आणि तीन जणांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काल रात्री आदेश जारी केले.

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदी राहुल भालचंद्र पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यानंतर रविंद्र हनुमंतराव ठाकरे, प्रकाश शामराव इंदलकर आणि गजानन श्रीधर निमदेव यांची राज्याच्या माहिती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यापैकी प्रकाश शामराव इंदलकर हे राज्य सरकारच्या सेवेतून उपसचिव म्हणून सेवा निवृत्त झालेले अधिकारी आहेत. राज्याच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला राज्याच्या माहिती आयुक्त पदी नियुक्त करण्यात आल्याने मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांच्यासह इतर राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीचा कालावधी हा तीन वर्षाचा राहणार आहे. तसेच वयाच्या ६५ वर्षापर्यंत त्यांची नियुक्ती राहणार आहे. माहिती आयुक्त पदासाठी शिफारस करण्यात येणाऱ्या समितीने या चार जणांच्या नावाच्या शिफारस करण्यात आल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही यावेळी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली हिच ती अधिसूचना 

About Editor

Check Also

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *