एमएमआरडीएचा खुलासा, अटल सेतुच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत मुख्य पुलाचा भाग असलेल्या रस्त्यावर नाही

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अर्थात एमएमआरडीएने दिली.

प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जून २०२४ रोजी केलेल्या तपासणी दरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतू रस्त्यावर फुट भराच्या भेगा पडल्याची बाब राज्य सरकारच्या नजरेस आणून दिल्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या एमएमआरडीएने तातडीने खुलासा करत या भेगा अटल सेतूच्या मुख्य संरचना असलेल्या पुलावर पडलेल्या नसून त्या मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यावर पडल्या आहेत. तसेच या भेगा पडलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबधित कंत्राटदाराला दिल्याची माहितीही एमएमआरडीएने आपल्या खुलाश्यात दिली.

About Editor

Check Also

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *