Breaking News

अप’घातवार डहाणू आणि मुंबईत अपघातांचे सत्र

मुंबई : प्रतिनिधी

नव वर्षाला १५ दिवस पूर्ण होत आले तरी मुंबईतील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. सांगली जिल्ह्यात ट्रँक्टर आणि क्रुज जीपला झालेल्या अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना होवून काही तासांचा अवधी होत नाही. तोच मुंबई महानगर प्रदेशातील डहाणू येथील समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात ३ मुलांचा मृत्यू तर ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा मृत्यूची घटना घडत नाही, तोच मुंबईतील डोमेस्टीक विमानतळावरील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली.

सांगली जिल्ह्यातील वांगी येथे ट्रँक्टर आणि क्रुज जीपच्या झालेल्या अपघातात ६ पैलवान मृत्यूमुखी पडले तर ६ जण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तर मुंबई महानगर प्रदेशातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील समुद्रात शाळा लवकर सुटल्याने समुद्रात बोटीने फिरण्यासाठी गेलेल्या ४० विद्यार्थ्यांची बोट उलटून अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच समुद्रात असलेल्या तटरक्षक दल आणि मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. यातील ३३ विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले असून ३ जणांचा बुडून मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी बेपत्ता झाला.

तर डहाणूपासून २० नॉटीकल माईल आणि मुंबईपासून ३० नॉटीकल माईल समुद्रात ओएनजीसीच्या हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते. त्यापैकी ३ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून उर्वरितांचा शोध घेण्याचे काम तटरक्षक दलाने हाती घेतले आहे. मृतदेह सापडत नाही. तोपर्यत शोध घेण्यात येणार असल्याचे तटरक्षक दलाच्यावतीने सांगण्यात आलयं.

या पाठोपाठ मुंबई सांताक्रुज येथील तील डोमेस्टीक विमानतळावरील टर्मिनल १ बी ला आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

याबरोबरच मुलुंड येथील लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जवळपास सात व्यक्ती जखमी झाले असून त्यांना तेथील जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बिबट्याला दिवस अखेर पकडण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *