Breaking News

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मेगाब्लॉक मागे घेण्याची केली मागणी..

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द होणार असल्याने ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ३०/३१ मे च्या मध्यरात्रीपासून ते २ जून पर्यंत ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी ३०/३१ मे च्या मध्यरात्री ते २ जून च्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल ३३ लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी केली.

मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था करावी, मासिक पास धारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे केल्या.

Check Also

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *