मुंबई

हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं प्रकरण काय ? सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली हेमांगी कवी म्हणते की....

हेमांगी कवी आपल्या रोखठोक भूमिकेमुळे आणि स्पष्ट विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. हेमांगी कवी समाज असो वा कलाविश्व कुठेही काही अनुचित प्रकार घडला की हेमांगी त्यावर बेधडकपणे तिचं मत मांडते.त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तर देते. मात्र, कायम इतकांना खडे बोल सुनावणाऱ्या हेमांगीने यावेळी …

Read More »

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक

मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. …

Read More »

८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ‘पु ल कला महोत्सव २०२३’ चे आयोजन सुधीर मुनगंटीवार करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु ल कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर …

Read More »

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा-कुणबी प्रमाणपत्र तपासणीसाठी “विशेष कक्ष”

मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, …

Read More »

सोडतीतील गिरणी कामगारांना लवकर घरांचा ताबा घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य- मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर

म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत १५ हजार ८७० गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली असून लवकरच गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले …

Read More »

काँग्रेसचा आरोप, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव मुंबई महानगरपालिका सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात का घेत नाही?

मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती, पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला …

Read More »

राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम …

Read More »

ईडीने जेट एअरवेजची ५३८ कोटींची मालमत्ता केली जप्त बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि लोकांच्या नावे १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक कॅम्पसचा समावेश आहे. यापूर्वी …

Read More »

दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी …

Read More »

सचिन तेंडुलकर याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत - एकनाथ शिंदे

सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. ढोल ताशांच्या गजरात या पुतळ्याचे दिमाखात अनावरण झाले. या सोहळ्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, …

Read More »