मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक

मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दावा केला आहे की, गुजरातमधील राजवीर खंत जो मुख्य आरोपी आहे, त्याने २७ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर या कालावधीत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून ShadabKhan@fencemail.com या ईमेल आयडीवरून मुकेश अंबानी यांना पाच मेल पाठवले. खंत यांने सुरुवातीला २० कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर उद्योगपतीने त्याच्या मेलला प्रतिसाद न दिल्याने मागणी वाढवून ४०० कोटी रुपये केली.

तसेच अन्य विद्यार्थ्याची ओळख तेलंगणातील गणेश आर वनपारधी असे आहे, ज्याने मीडियामधील धमकीच्या मेलचे वृत्त वाचून एक मेल पाठवला. या प्रकरणातील सहावा धमकीचा मेल त्याच्या ईमेल आयडीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याने धमकीचा मेल करत ५०० कोटींची मागणी केली. वनपारधीला कोर्टात हजर केले असता त्याला ०८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

About Marathi E Batmya

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली सेंच्युरी मिलचा लीज प्रस्ताव ताबडतोब थांबवा आणि गिरणी कामगारांचे ऑनसाइट पुनर्वसन सुनिश्चित करा

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *