मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. …
Read More »सकाळी सकाळी चालत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न आरपीएफ पोलिसांकडून आरोपीला अटक
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिट वाजता ही …
Read More »म्हाडाला द्यायचे होते ९८ हजार चौ. फु. जागेचे बांधकामः पण मिळाले ४० हजार चौ.फुट चटई निर्देशांक घोटाळ्यात म्हाडाला १४५ कोटी रूपयांचा विकासकाकडून चुना
दादर येथील लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार आणि पर्यावरण खात्याने निर्धारीत केलेल्या सरप्लस अर्थात अतिरिक्त जागेसह चटई निर्देशांक क्षेत्रफळाचे जवळपास ९८ हजार चौ.फुटाचे बांधकाम देणे अपेक्षित असताना विकासकाने अवघ्या ४० हजार चौ.फुटाचे बांधकाम म्हाडाला हस्तांतरीत केल्याने आणि त्याकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल १४५ कोटी …
Read More »..अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले… मुख्यमंत्र्यांकडून युवकाला तातडीची मदत
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता …
Read More »अजित पवार यांचा सवाल, असं काय घडलंय की १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय… सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज काय
ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी …
Read More »राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार
ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात २५ टक्क्यांनी वाढ मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. या विभागाच्या महसूलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. …
Read More »औरंगाबाद – पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण दरम्यानच्या ५१ वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पाहणी केली. औरंगाबाद येथील पैठण येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची पाहणी केल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व याबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, …३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा भाजपा श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणार...
आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य …
Read More »पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे म्हणतात, लाठीमार नाही किरकोळ झटापट
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होणार होती. मात्र तत्पूर्वीच आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या आधीच वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठविली. त्यावरून अखेर पिंपरी-चिंचवडचे पोलिस …
Read More »
Marathi e-Batmya