राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व …
Read More »माऊलींच्या दिंडीला गालबोट; पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज काही काळ वातावरण तणावाचे झाले
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार होते. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले. वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक …
Read More »अमित शाह यांच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर,… ये डर अच्छा है नांदेड येथील सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या भाजपाकडून देशातील ३०० लोकसभा मतदारसंघात मोदी @ ९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमातंर्गत गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र या सभेत मोदी सरकारच्या काळात घेतलेल्या कामे सांगण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे …
Read More »सत्तेत बसणाऱ्यांचा राष्ट्रवादीवर…जयंत पाटील यांचे भाजपावर टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ …
Read More »जलवाहतुक आणि पर्यटनासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार
जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, …
Read More »मुंबईतील डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा शिंदे-भाजपा सरकारचा निर्णय भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांची माहिती
मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणा-या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …
Read More »“सकाळचा भोंगा…” धमकीचा फोन आल्यानंतर संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र सुनिल राऊत यांना आला होता संजय राऊत यांना धमकी देण्याचा फोन
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञाताने फोन कॉलच्या माध्यमातून दिली. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली. यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र …
Read More »शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवार यांची मागणी,…मास्टरमाईंड शोधा डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक...
पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी करत अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »शरद पवार धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे यांचा इशारा,…. तर देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार शरद पवारांना सोशल मिडियावर धमकी ; खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर …
Read More »धनंजय मुंडे यांची आता क्रिकेटच्या मैदानात एन्ट्रीः हा संघ घेतला विकत एमसीएकडून आयोजित स्पर्धेत खेळणार मुंडेंचा संघ
भाजपाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात चांगल्याप्रकारे यशस्वी यशस्वी ठरल्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री मारली आहे. पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेचं १६ ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केलं आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीगमध्ये खेळणार …
Read More »
Marathi e-Batmya