मुंबई

ओसी नसलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी खुषखबर: सरकार आणणार नवा कायदा राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार- एकनाथ शिंदे

मुंबई शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती उभारल्या जात आहेत. मात्र यातील अनेक इमारतींना रहिवाशी रहायला आल्यानंतरही वर्षानुवर्षे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांना पाणी कर, मलनिस्सारण कर दुप्पट भरावा लागतो. विकासकाने न भरलेल्या करांमुळे रहिवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागत.  त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना …

Read More »

एसटीप्रश्नी कर्मचाऱ्यांना फटकारत न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसाची मुदतवाढ कामावर का परत जात नाही – न्यायालयाचा सवाल

चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात नोंद घेत तुम्हाला कामावर परत जायला काय हरकत आहे असा सवाल एसटी कर्मचारी संघटनांना करत विलिनीकरणाबाबत अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या …

Read More »

या ९७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक २०२० सालच्या पोलिस पदकं सन्मानपूर्वक प्रदान

पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके …

Read More »

बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी मुंबई पोलिसांनी काढले आदेश

बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला …

Read More »

राणे पिता-पुत्राला अटी व शर्तींवर आधारीत जामीन मंजूर दिशा सालियन बदनामी प्रकरणात दिंडोशी न्यायालयाचा निर्णय

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तीच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सालीयन कुटुंबियाने केलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना आज दिंडोशी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज …

Read More »

म्हाडाच्या ट्रांझीट कॅम्पमध्ये घुसखोरी झाली तर रेंट कलेक्टर घरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबईत असलेल्या संक्रमण शिबीरात जे घुसखोर बेकायदेशीर वास्तव्यास आहेत, त्यांची चौकशी सुरू केली असून त्यांना बाहेर काढावे लागेल. यापुढे संक्रमण शिबीरात घुसखोर घुसणार नाहीत, यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. घुसखोर आढळल्यास त्याठिकाणच्या रेंट कलेक्टरला घरी बसवले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली. मुंबई शहरात अनेक मोडकळीस …

Read More »

नवाब मलिकांच्या ईडी विरोधातील याचिकेवर न्यायालय म्हणाले, अंतरिम आदेश… ईडीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

ईडीने केलेल्या कारवाईच्या पध्दतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हेबॅबीस कार्पस या विशेष याचिकेद्वारे उच्च न्यायालयात दाद मागत सुटकेचे अंतरीम आदेश द्यावे अशी मागणी केली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने काही वादातीतल मुद्दे सविस्तर ऐकावे लागतील त्यामुळे मध्येच असा अंतरीम आदेश देता येणार नाही असे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी पण… महापालिकेच्या वातावरणीय कृती आराखडा अहवाल प्रकाशित

मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो. हा विषय आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी ज्या सुविधा उभारतो त्या उभारतांना त्या पर्यावरणस्नेही आहेत का याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. निरोगी जगण्यासाठी चांगलं वातावरण आवश्यक आहे. पण मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात पण येथल्या …

Read More »

राणे भावांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात FIR तर नौपाडा येथे तक्रार अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दिली एफआयआर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री …

Read More »

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: ८० रिक्षा आणि १७ टॅक्सी मार्गासाठी प्रवाशी भाडे जाहीर नमुद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाडे भाड्यापेक्षा मीटरप्रमाणे देय होणारे भाडे हे कमी असते. मुंबईतील विविध भागातील प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर-ए-ऑटोरिक्षांच्या ८० मार्गांना …

Read More »