मुंबई

मुंबई पोलिसांनी न्यायालयात केली केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दाव्याची पोलखोल राणेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन केला नसल्याची माहिती

दिशा सालियन हिच्या मृत्यू संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण मंत्री आणि त्यांचे सुपुत्र तथा भाजपा आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर राणे पिता-पुत्रांची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी केंद्रिय मंत्री आहे म्हणून …

Read More »

जे.जे. रुग्णालयातील पात्र वारसदारांना नियुक्त्या देणार: लाड पागेसह नवी समिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

भायखळा येथील सर जे.जे. रुग्णालयातील पात्र असलेल्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यांचे अभिप्राय दोन-तीन दिवसात मिळाल्यास पुढील आठवड्यात संबंधित वारसदारांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश काढण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख …

Read More »

मंत्री नवाब मलिकांना आता न्यायालयीन कोठडीः जामीन मिळण्याची शक्यता पीएमएलए न्यायालयाचा निकाल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत आल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २३ फेब्रुवारीला मनी लॉडरींग प्रकरणी ईडीने ताब्यात घेवून ९ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला ३ मार्च पर्यंत तर नंतर ७ मार्च …

Read More »

चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या डबेवाल्यांना मिळाले हक्काचे ‘भवन’ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक

बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स …

Read More »

दिशा सालियन प्रकरणी पोलिस चौकशीला गेल्यानंतर नितेश राणेंनी केले “हे” ट्विट खेल आपने शुरू केला खत्म करेंगे असे सांगत ठाकरे सरकारला इशारा

दिशा सालियन प्रकरणी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिशाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी आज बोलावले. तेव्हा नितेश राणे यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत एकाच गाडीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे हे …

Read More »

दिशा सालियनप्रकरणी न्यायालयाचा राणे पिता-पुत्रांना दिलासा १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही

सालियन कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे महिला आयोगाने दिलेल्या आदेशान्वये मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या गुन्ह्याच्या विरोधात राणे पिता-पुत्राने दिंडोशी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालये त्यांना १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही असे निर्देश देत संरक्षण …

Read More »

नवाब मलिकांना दिलासा नाहीचः ईडी कोठडीत वाढ ७ मार्च पर्यंत वाढविली

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी अंडरवर्ल्डशी संबधित आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींकडून जमिन खरेदी केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केली. याप्रकरणात त्यांना सुणावन्यात आलेली ईडी कोठडी आज ३ मार्च रोजी संपत आल्याने चौकशीसाठी आणखी काही दिवस त्यांना ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडी वकिलांनी केली. त्यानुसार त्यांना आणखी …

Read More »

महापालिका म्हणते, इमारतींच्या ओसी प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनाच वेळ नाही ८ महिन्यापूर्वी पत्र पाठवूनही कुलगुरुंचे मौन! मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींच्या ओसी प्रकरणात कुलगुरु लक्ष देत नसल्याची बाब समोर आली आहे. ८ महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने कुलगुरु यांस पत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठाने त्या पत्रास गांभीर्याने घेतले नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या पत्रात केला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील २ वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे तर हेमंत नगराळे सुरक्षा मंडळाचे संचालक राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची …

Read More »