मुंबई

प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतीमान करण्यासाठी सुधारित कार्यनियमावली राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमध्ये मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती आदी बाबींसंदर्भात तरतुदीचा समावेश आहे. अशी पहिली …

Read More »

मुंबई महानगरात ‘केबल कार’, प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने …

Read More »

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश

पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्‍टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मान्यता, अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींचा निधी नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा

कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व …

Read More »

कॉलेज बदलण्यास सांगितले म्हणून युवकांने आई-वडिलांनाच मारून टाकले नापास होत असल्याच्या कारणामुळे कॉलेज बदलण्यास सांगितले होते

कॉलेज बदलण्यास सांगितल्यानंतर २५ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने नागपुरात आपल्या पालकांची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी घडली होती परंतु १ जानेवारी रोजी शहरातील एका घरात लीलाधर डाखोळे (५५) आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे (५०) यांचे मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. या जोडप्याचा मुलगा, उत्कर्ष डाखोळे …

Read More »

२६-११ च्या हल्ल्यातील आरोपी तबव्वूर राणाला अमेरिका भारताच्या हवाली करणार अमेरिकन न्यायालयाचा निर्णय

भारतासाठी राजकीय मुस्तुदीपणात आणखी एका विजयाची भर पडली असून मुंबईतील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणास अमेरिकन न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार आहे. तहव्वूर राणा या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला एफबीआयने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १५ वर्षे झालेली १३ हजार वाहने भंगारात काढा पुढील १०० दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे झाले नामांतर आता राहणार एनएमडीपीएल असे नाव नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) असे नामांतर

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL), धारावीच्या सुधारणेची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेणारी कंपनी, सर्वांगीण मूल्य प्रस्तावना आणि कॉर्पोरेट व्हिजनच्या नूतनीकरणाला प्रतिसाद म्हणून स्वतःचे पुनर्ब्रँडिंग करत आहे. कंपनीचे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) हे रीब्रँडिंगच्या केंद्रस्थानी आहे – आधुनिक, सर्वसमावेशक आणि दोलायमान समुदाय तयार करण्याच्या कंपनीच्या वचनाशी जुळणारे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच गुणवत्ता राखा राज्य विद्युत मंजळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक

महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज …

Read More »

मुंबईमधील होमगार्डच्या २७७१ रिक्त जागा भरणार १० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज …

Read More »