महेंद्र गायकवाड विरूध्द शिवराज राक्षे लढतीत शिवराज ठरला महाराष्ट्र केसरी मानाची गदा आणि थार गाडीचा मानकरी

पुण्यात आज शनिवार ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.

अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे. तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *