मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करारनाम्याचे हस्तांतरण

मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, एअर इंडिया कंपनीचे वाणिज्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला १६०१ कोटी रूपये देत या इमारतीची खरेदी केली. दरम्यान, पैसे देऊनही या इमारतीची मालकी राज्य सरकारकडे नव्हती. मात्र आता त्याच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एअर इंडियाची अॅसेट होल्डींग कंपनीसोबत इमारत करारनाम्याचे हस्तांतरण करण्यात आले. मंत्रालयापासून आता हाकेच्या अंतरावर इतकी मोठी भली मोठी इमारत राज्य सरकारला मिळाल्याने आता मंत्रालयातील वाढीव विभआगात किंवा ज्या विभागांना मंत्रालयात जागा मिळाली नाही. ते सर्व विभाग आता एअर इंडियाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.

About Editor

Check Also

गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *