राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल फाईटिंग इंडियन स्टेट वक्तव्य प्रकरणी आसाममध्ये गुन्हा

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाषण करताना फाईटिंग इंडियन स्टेट असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून नुकसाच आसामची राजधानी गुवाहाटी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनजीत चेतिया नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली, ज्याने गांधींवर “अस्थिरता आणि फुटीरतावादी भावनांना उत्तेजन देणारी धोकादायक कथा तयार करण्याचा” आरोप केला.

गुवाहाटीतील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये “भारताच्या सार्वभौमत्वाची एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांसाठी” बीएनएसच्या कलम १५२ आणि १९७(१)डी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला, जो एक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.

राहुल गांधी म्हणाले, “भाजपा आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता आम्ही भाजपा, आरएसएस आणि फायटिंग इंडियन स्टेट शी लडत असल्याचे वक्तव्य केले. राहुल गांधी यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीतील कोटला रोड येथील काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हे वक्तव्य केले होते.

तक्रारदाराने आरोप केला की राहुल गांधींच्या विधानामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. चेतिया यांनी असा दावा केला की राहुल गांधी यांचे शब्द राज्याच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न होता, ज्यामुळे अशांतता आणि फुटीरतावादी भावना निर्माण होऊ शकतात अशी धोकादायक असल्याचे सांगत तक्रार दाखल केली.

राहुल गांधी यांनी “आपला लढा “भारतीय राज्याविरुद्ध” असल्याचे घोषित करून, आरोपीने जाणीवपूर्वक जनतेमध्ये विध्वंसक कारवाया आणि बंडखोरी भडकावली आहे. राज्याच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवण्याचा आणि त्याला एक शत्रुत्वाची शक्ती म्हणून चित्रित करण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यामुळे अशांतता आणि फुटीरतावादी भावना निर्माण होऊ शकतात असा दावाही चेतिया याने आपली तक्रार दाखल करताना केला.

चेतिया पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य वारंवार झालेल्या निवडणुकीतील अपयशांमुळे झालेल्या निराशेतून प्रेरित असल्याचे दिसून येते.

“विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी आहे की ते लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास राखतील, परंतु त्याऐवजी त्यांनी खोटेपणा पसरवण्यासाठी आणि बंडखोरी भडकवण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले,” असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

“लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास मिळवण्यात अयशस्वी झाल्यामुळे, आरोपी आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांच्या पदामुळे लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास राखण्याची जबाबदारी येते, हे वर्तन विशेषतः चिंताजनक आहे. त्याऐवजी, आरोपीने खोटेपणा पसरवण्यासाठी आणि बंडखोरी भडकवण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आल्याचा दावा चेतियाने केला आहे.

चेतिया यांनी तक्रार केली की राहुल गांधी यांचे वक्तव्य भारतीय राज्याच्या अखंडतेला आणि स्थिरतेला थेट आव्हान देते, ज्यामुळे बीएनएसच्या कलम १५२ अंतर्गत तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *