संजय राऊत म्हणाले, शिवरायांच्या जन्माबाबत या उपटसुंभ लोकांना माहित आहे का?

कोकण महोत्सवात भाषण करताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आला. त्यावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. लाड यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत चांगलाच समाजाच घेतला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय? असा सवाल भाजपाला केला. याचबरोबर ‘करारा जबाब मिलेगा’ असं सांगत इशाराही दिला.

राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद लाड बोलताना म्हणाले, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली, असे वक्तव्य प्रसाद लाड करताना दिसतात.

याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराजांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे, असा टोला राष्ट्रवादीने लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *