अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना म्हणाले, भिक्कार## झाली असेल तर…

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना औरंगाबादेत वृत्तवाहीनीशी बोलताना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

लोकशाही या वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर अब्दुल सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घालत इतकी भिकार## झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ असे खळबळजनक वक्तव्य केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे सत्तार यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांना शिवी घालत, “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर दिले.

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत, असं सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही.

यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना मद्यपानासंदर्भात कॅमेरासमोर विचारलेल्या प्रश्नामुळे अब्दुल सत्तार अडचणीत आले होते. त्यानंतर सत्तार यांनी वरील वक्तव्य केले.

About Editor

Check Also

रविंद्र चव्हाण यांचा इशारा, भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई भाजपामधून फुटून सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *