आदित्य ठाकरे यांचे आश्वासन, क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी रद्द करणार पुण्यात कोणत्या झाडीतला पैसा सापडला ? निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल

कोळीवाड्यातील शासनाच्या ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बद्दल राज्य सरकारला धारेवर धरत ही पॉलिसी कोळी बांधवांसाठी अन्यायकारक असून आमचं सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी ही पॉलिसी तात्काळ रद्द करणार असल्याचं आश्वासन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलं.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुंबईतील कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वरील घोषणा केली.

आज मुंबईतील वेगवेगळ्या कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवांनी आदित्य ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली, आणि सरकारच्या ड्राफ्ट क्लस्टर डे्हलपमेंट पॉलिसीच्या अन्यायकारक धोरणासंदर्भात माहिती दिली. या वेळी आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना ‘आमचं सरकार आल्यावर पहिल्या दिवशी क्लस्टर डेव्हलपमेंट रद्द करू आणि सेल्फ डेव्हलपमेंट करू’ असं आश्वासन दिलं . या संदर्भात आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली .

कोळीवाड्यांच सिमांकन आम्ही करणार- आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यावेळी पुढे बोलताना म्हणाले की ‘गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही मुंबई महाराष्ट्रासाठी लढतोय. कारण इथली राजवट जनतेविरोधत विरोधात आहे . मुंबई मधले सगळे प्लॉट आणि महापालिकेच्या अखत्यारीतील प्लॉट विकायला काढले आहेत. यात कोळी बांधवांनी मांडलेली व्यथा आणि त्यांच्यावर होणारा अन्याय आमच्या पुढे आला. गावठाण आणि कोळीवाड्यांवर त्यांचं लक्ष गेलं आहे . तिथे क्लस्टर करणार आहेत. आज कोळी बांधव ज्या क्षेत्रात राहतात त्यांना एका जागेत कोंबल जाणार आहे . हे सरकार बिल्डरला फुकटात भूखंड देत आहे . पण कोळी वाड्याचं सीमांकन झालं पाहिजे, आणि आम्ही आमचं सरकार आल्यावर ते करणार असं आश्वासन यावेळी दिलं.

पुण्यात कोणत्या झाडीतला पैसा सापडला ? निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल

पुण्यात पोलिसांनी कारवाही करत रात्री ५ कोटी रुपयांची रोकट पकडली त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘पकडलेले पैसे झाडी डोंगर कुठून आले आहेत हे तपासा. इलेक्शन कमिशन न्यूट्रल असेल तर त्यांनी तपासाचे ते काम केल पाहिजे. सत्ताधारी पक्षातलं कोणी असेल तर नाव पुढे येणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल’ असे अप्रत्यक्ष आव्हानही केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *