मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तसेच २५ तारखेला मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी पुढील रणनीती जाहिर करणार असल्याची घोषणा करत आमरण कडक उपोषण करणार असल्याचे जाहिर केले. तसेच जोपर्यंत मराठा समजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत गावाची सीमाही शिवू देणार नाही असा इशारा दिला. तसेच आरक्षण देत नाही तोपर्यंत राजकिय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा दिला. त्यांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील आंदोलकांना मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका असे भावनिक आवाहन ट्विटद्वारे केले.
मुख्यमंत्री शिंदे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे आश्वासनही दिले.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली असून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. ही दिलासादायक बाब असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आधार देणारी आहे. राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही यावेळी केला.
#मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील…
मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका…
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, राज्य सरकार मराठा… pic.twitter.com/EL5U4BspjA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2023
Marathi e-Batmya