अजित पवार यांचा छगन भुजबळ यांना फोन मंत्री पदासाठी फोन केल्याची चर्चा

राज्यातील भाजपा आणि महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फोन केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान अजित पवार यांनीच फोन केल्याने भुजबळांची नाराजी कमी झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

छगन भुजबळ यांनी सांगितले की, मला मंत्रिपद न दिल्याबद्दल अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी मला फोन केला होता, असे सांगत त्यांनी यासंदर्भात बसून बोलणार असल्याचे सांगितले आहे.
छगन भुजबळांच्या या दाव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून भुजबळांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतापले होते, हे अजित पवारांच्या माफीवरून स्पष्ट झाले, त्यांना शांत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भुजबळांना फोन करून बोलण्यास सांगितले.

दरम्यान छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त करत अजित पवार यांचे नाव न घेता पक्षावर निशाणा साधत त्यांनी ‘जहां नही चैन, एक नहीं रहना’ म्हणत मनातील वेदना व्यक्त केले होते. भुजबळांची वाढती नाराजी पाहून अजित पवारांनी त्यांना फोन केला.

त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या निकटच्या संबधावरून आणि कृषी विभागातील वस्तू खरेदी प्रकरणातील घोटाळ्याप्रकरणी सध्या नाव चांगलेच चर्चेत आहे. तसेच आज धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीच्या घटस्फोट प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या पत्नीच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे सरकार आणि पक्षाची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना लवकरच राजीनामा देण्यास सांगण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्री पदाच्या अनुषंगानेच फोन केल्याचे बोलले जात आहे.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *