राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.
ज्या – ज्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत त्या प्रचाराच्या मोहिमेची सुरुवात आज प्रदेश कार्यालयातून करण्यात आली.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून महायुती सरकारने केलेल्या लोककल्याणकारी योजना… लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दिलेला लाभ… शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेली वीज माफी… मोफत तीन गॅस सिलेंडरची योजना… मुलींच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलण्याचा क्रांतीकारी निर्णय… अशा अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत… मतदारापर्यंत पोचवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
विकासाला आम्ही मागे नाही हटणार,
जनसेवेला आम्ही सदैव प्राधान्य देणार,
दिलेला शब्द आम्ही नाही मोडणार,
तुमचं-आमचं नातं आपुलकीनं जपणार..!शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तसंच तुमच्या-आमच्या हक्काच्या महायुती सरकारनं समाजातील विविध… pic.twitter.com/e3NlacDVZ7
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2024
Marathi e-Batmya