अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला डिवचलं, आता कुठे गेले तुमचे वाघ? मंत्री मार खातायत, साताऱ्यातील घटनेवरून खिल्ली उडविली

सातारा जिल्हा परिषद निवडणूकीतील रणनीतीवरून नैसर्गिक युतीतील भाजपा आणि शिवसेना ओएफसी वाद रंगल्याचे चित्र दिसायला लागले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत व्हीप बजावण्यासाठी गेलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी पक्षातील मंत्रीच या सत्तेसाठी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाह्यला मिळाले. दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची वस्तुस्थिती विधानसभेत सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यावरून शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाला डिवचत खोचक टोले लगावले.

विधान परिषदेत अनिल परब म्हणाले की, आता तुमचे वाघ कुठे गेले, मंत्री मार खातायेत, राष्ट्रवादीनेही मार खाल्ला, या राज्यात काय चाललंय मंत्रीच मार खातायत असे सांगत सत्तेतून बाहेर पडण्याचे आल्हान दिले.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही घडलं नाही ते आज पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली. या निवडणूकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्रीच पोलिसांचा मारहाण खातायेत. जर मंत्रीच मार खात असेल, तर आम्ही या घटनेकडे मंत्री म्हणून नव्हे तर सरकारम्हणून पहात आहोत. या राज्यात मंत्री मार खात असतील, सत्तेतील कार्यकर्त्ये मार खात असतील? तर सर्वसामान्य व्यक्तींच काय असा सवालही यावेळी केला.

अनिल परब पुढे म्हणाले की, दिवसांपूर्वी काहींनी उठाव केला. हा उठाव केला गेला तर त्यांचा स्वाभिमान राष्ट्रवादी चिरडतेय. त्यासाठी सत्ता पालट केली. आम्ही वाघ आहोत असं सांगतात. मात्र आज या राज्यात मंत्री मार खात आहेत. मंत्र्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की, ते भारतीय जनता पक्षाचं नाव घेण्यासाठी ते घाबरतात. पोलिस तुम्हाला मारतात आणि तुम्ही गप्प बसता? मग तुमचा स्वाभिमान कुठे गेला ? मला तर वाईट वाटतं की राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय, म्हणजे फक्त शिवसेनाच शिंदे गट नाही तर राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय. मंत्री मार खातायेत. सत्तेतील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पायऱ्यांवर आंदोलन करतात. जे स्वतःला वाघ समजत होतेते वाघ कुठे गेले ? हे वाघ आता शेपूट घालून बसलेले आहेत. आता त्यांची भाजपाच्या विरोधात बोलण्याची हिंमत होत नाही अशी खोचक टीका शिवसेनेवर केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *