काँग्रेस विधिमंडळ पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर: अमित देशमुखांवर जबाबदारी विधानसभा उप नेते पदी आ. अमिन पटेल, सचिवपदी आ. डॉ. विश्वजित कदम, विधानपरिषदेत गट नेतेपदी आ. सतेज पाटील

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

“विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्वाची भूमिका बजावतील” असे सांगून प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसच्या विधिमंडळाच्या निवडीत पहिल्यांदाच काही जून्या आणि परंतु तरूण आमदारांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसची परंपरागत टीम कशा पद्धतीने विधिमंडळात काम करते हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. त्याचबरोबर परंपरागत नेते बाळासाहेब थोरात, आणि इतर नेत्यांना मात्र या प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले आहे. विधानसभेत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांच्यावर पहिल्यांदाच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सतेज बंटी पाटील हे वास्तविक पाहता राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. मात्र आता त्यांच्यावर विधान परिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *