आशिष शेलार यांची मागणी, संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा उबाठा सेनेच्या निकृष्ठ कामांमुळे मुंबईकरांचे हाल

आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेन मागील २५ वर्षात जी निकृष्ठ दर्जाची कामे केली, त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज दादर वसंतस्मृती येथे पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांनी एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यामुळे महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तीला रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या कार्यकारी संपादक पदी ठेवू नये. तर राज्यसभेच्या सदस्य पदी राहण्याचा अधिकार आहे का? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

‍शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, उबाठा सेनेने गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असताना जी कामे केली ती निकृष्ठ दर्जाची आहेत. ब्रिमस्टोवॅड हा प्रकल्प वेळेत पुर्ण झाला नाही. हजारो कोटी खर्च करुन पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ते उभी करु शकले नाहीत. गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत. जगविख्यात डॉ. अमरापूकर यांचा जो गटारात पडून मृत्यू झाला त्याचे आधी पापक्षालन करा, अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *