उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, रामाचे नाव घेत सध्या दगड पाण्यावर तरंगतायत… धनुष्यबाण गेला तरी राम माझ्यासोबत

त्या काळी श्रीलंकेतील रावणाला हरविण्यासाठी रामसेतू बांधताना रामाच्या नावाने समुद्राच्या पाण्यात दगड टाकले जायचे आणि तरंगायचे असा रामनवमीचा संदर्भ देत आज रामाचे नाव घेत जे काही दगड तरंगताना दिसत आहेत ते केवळ दगड आहेत असा खोचक टोला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपाला लगावत पुढे बोलताना म्हणाले मात्र माझ्या हाती शिवधनुष्य जरी नसले तरी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे रामाचा आर्शिवाद माझ्यासोबत आहे असा विश्वास व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यातील निहाल पांडे या युवकांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरू केली होती. आज अखेर ही यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले एका दृष्टीनं जर पाहिलं तर असं कोणीतरी कोणासाठी एवढे किलोमीटर पायपीट करत येणं हे सध्याच्या काळात अशक्य आहे. पण तुम्हाला मातोश्रीवर यावं वाटणं आणि माझ्यासोबत उभं राहावं असं वाटणं मी हा एक रामाचा आशीर्वाद मानतो, माझं धनुष्यबाण चोरून नेलं असलं तरी श्रीरामांचा आशीर्वाद अजूनही माझ्यासोबत आहे. आपल्याकडे जरी धनुष्यबाण नसला तरी आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धनुष्यबाण चोरून नेल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *