अतुल लोंढे यांची मागणी, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक रूपयाची भीक आता भिकारीही घेत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा दिल्याचे आक्षेपार्ह वक्यव्य केले. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणीही केली.

अतु लोंढे शेवटी बोलताना म्हणाले की, “हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते, स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते? पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा सावल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *