स्मिता ठाकरेनंतर आता आणखी एका ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट मुख्यमंत्र्यांना माझा पाठिंबा - निहार ठाकरे

शिवसेनेत बंडखोरी करून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागलेल्या शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी सोबतच ठाकरे कुटुंबाच्या संख्येत देखील आता वाढ होत चालली आहे . स्मिता ठाकरे यांच्या नंतर आता निहार ठाकरे यांनीदेखील आज मुख्यमंत्र्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री ,खासदार आमदार हे मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आदित्य ठाकरे यांना वगळता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आज बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव व उध्दव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे यांनी भेट घेवून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या .

मुख्यमंत्र्यांना माझा पाठींबा – निहार ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझा पाठींबा आहे मी आपल्याच पक्षाच्या लोकांना भेटायला आलो आहे. त्यांना लागणाऱ्या कायदेशीर बाबींसाठी मी त्यांना मदत करायला इच्छुक आहे असे निहार ठाकरे यांनी सांगितले. परंतु आपण राजकारणात येणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *