राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर रोजी जाहिर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील एकदम या पाच ते सहा सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधत म्हणाले की मुख्यमंत्री कार्यालयायतून जाण्याची इतकी घाई का असा सवाल अधिकाऱ्यांना करत परत येणार नाही असे वाटते का असा सवाल बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना केला असल्याची चर्चा राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रंगली होती.
वास्तविक पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून लॉबिंग करण्यात येते. तसेच सरकारच्या परत येण्याचे संकेतही या अधिकाऱ्यांना सर्वात आधी मिळतात. त्यामुळे सरकार परत येणार असेल तर मंत्रालयातील अधिकारी आहे त्या पदावर किंवा मंत्री कार्यालयात पुढील कालावधीसाठीही आपली खुर्ची निश्चित करतात किंवा चांगल्या पदावर बदली करून घेतात. मात्र यावेळी आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने हे सरकार परत येणार नाही असा विश्वास मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. अनेक अधिकारी नवं सरकार येण्याच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकाऱ्यांनी बदली करून घेणे किंवा त्यांची बदली होण्याची अलिखित प्रथा राज्यात आहे.
परंतु राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यातील एकदम पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे किंवा करून घेतल्या यावरून वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
सर्वसाधारणपणे आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा सरकारच्या अनिश्चितेवरूनच अनेक अधिकारी त्यांच्या बदलीचे निर्णय घेतात. प्रसंगी संबधित अधिकाऱ्यांना त्यांच्या इतर प्राईम पदावर बदली करून मुख्यमंत्री कार्यलयातून सन्माने परत पाठविले जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून संबधित अधिकाऱ्यांची पदस्थापनाही इतर विभागात करण्यात आली.
त्यामुळेच निवडणूक होण्या आधीच अधिकारी का सोडून चालले असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनात निर्माण झाल्याची या निमित्ताने मंत्रालयात सुरु झाली आहे.
दरम्यान, बदल्यांच्या प्रकरणावर स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बोलावत संवाद साधत म्हणाले की, एकाच वेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बदल्या करून घेतल्या. मी आणि माझे सरकार परत नाही असे वाटतेय का असा सवाल बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना करत त्यामुळेच तुम्ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच तुम्ही सर्वांनी बदल्या करून घेतल्या असा सवालही अधिकाऱ्यांना केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे हेच ते आदेश

Marathi e-Batmya