आदित्य ठाकरे ११ नोव्हेंबरला राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहोचली. या यात्रेत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सहभागी होणार होते. मात्र आता दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदीजण सहभागी होणार आहेत. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर काही नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान १९ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत नाहीत. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबाह्य सरकार गायब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमध्ये महिला सुरक्षित नसल्याचं गंभीर मत व्यक्त केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ११ नोव्हेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचं प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोललं की चौकश्या लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा…हे सगळं चाललं आहे ते हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत; किंबहुना हुकूमशाही आलेलीच वाटत आहे. सभेला परवानगी नाकारता, सुषमा अंधारेना परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळलं… महिलांचा छळ सुरू आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत; उद्या पत्रकारांना देखील छळतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *