भाजप उधार उसनवारीवर चालणारा पक्ष काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
भाजपमध्ये आणखी आवक होणार असल्याची सुवार्ता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐकवली आहे. त्याचे काय व्हायचे ते होईल पण या निमित्ताने भारतीय जनता पक्ष हा उधार उसनवारीवर चालणारा पक्ष आहे हे मात्र सिद्ध झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.
जगातील सर्वात मोठा पक्ष अशी शेखी मिरवणारा भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना लोकसभा किंवा विधानसभेचे तिकीट देत असतो याचा अर्थ नेहमी समर्पित कार्यकर्त्यांची बढाई मारणारा हा पक्ष स्वतःचे सक्षम उमेदवार उभे करू शकत नाही, तो उधार उसनवारीवर चालणारा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *