भाजपाच्या वाघ म्हणाल्या, मंत्री राठोडांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून वाट कसली बघताय? पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान

मुंबई : विशेष प्रतिनिधी

बीडची तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा संबध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावे ही त्यांच्याशी जोडले जात असल्याने मंत्री राठोड यांच्या मुसक्या आवळायला वाट का बघताय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले.

काही दिवसांपूर्वी पुणे येथे बीडची तरूणी पूजा चव्हाण हिने एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एक व्यक्ती संबधित व्यक्तीला मोबाईल काढून घे सारख्या सूचना देत होता. त्यातील आवाजावरून सदरचा व्यक्ती हा महाविकास आघाडीतील मंत्री असल्याचे संकेत मिळत होते. तसेच सदर तरूणी आणि तिच्या कुटुंबियासोबत या मंत्र्याचे फोटो देखील समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने मंत्र्याशी संबधित ती तरूणी असल्याचे स्पष्ट झाले.

सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची गरज असताना अशी कोणतीही गोष्ट झाली नाही. अखेर प्रकरण काही समाजमाध्यमातून उघडकीस आल्यानंतर भाजपाने याप्रकरणी मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यापार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पुरावे असल्याने मंत्री संजय राठोड यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान दिले. (बातमीसाठी वापरण्यात आलेला फोटो हा पूजा चव्हाण हिच्या कुटुंबियासोबतचा असल्याबाबत मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाने कोणतीही तपासणी केलेली नाही. तसेच हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे.)

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *