बंधू राज, मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली शंका

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू झाला. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उडी टाकली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे.

प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे, पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.

बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही !

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *