Breaking News
Chhagan Bhujbal Sharad Pawar

छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या घरी दाखलः तर्क वितर्कांना उधाण मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतल्याचा भुजबळ यांचा खुलासा

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडात अजित पवार यांची छगन भुजबळ यांनी साथ दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीसाठी व्यक्तीशः अजित पवार आणि इतर नेत्यांकडूनही टाळले जाते. त्यातच नुकताच अजित पवार पक्षाच्यावतीने बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान रॅलीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोलही केला. असे असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज दुपारी १२ च्या सुमारास अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घराकडे आज अचानक भेटीसाठी सिल्व्हर ओक हे निवासस्थान गाठले. या अचानक भेटीमुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या सिल्हर ओक या निवासस्थानी छगन भुजबळ यांच्या शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार मिलिंद नार्वेकर हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार यांच्यातील चर्चा संपली तरी छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी भेटीसाठी बोलावले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर दिड तासाच्या वेटींगनंतर शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेट दिल्याचेही बोलले जात आहे.

त्यातच छगन भुजबळ यांनीही बारामतीत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आज कोणत्याही वेळेशिवाय थेट भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर वर पोहोचले. मात्र केलेल्या टीकेची माफी मागण्यासाठीच शरद पवार यांच्याकडे भुजबळ गेल्याचे बोलले जाऊ लागले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना याबाबत विचारले असता याबाबत फारशी माहिती नसल्याचे उत्तर दिले.

त्याचबरोबर इतर नेत्यांनाही यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर अखेर छगन भुजबळ हे तब्बल अर्धातासानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडल्यानंतर यासंदर्भात विचारले असता त्यांनी यासंदर्भात शासकिय निवासस्थानी यासंदर्भात बोलू असे सांगितले.

दरम्यान, छगन भुजबळ हे शासकिय निवासस्थानी पोहोचल्यानंतर फारच उद्विग्न झाल्याचे आणि प्रसारमाध्यमांना कोणते कारण सांगायचे या विवंचनेत पडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सध्या राज्यात सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील सगळ्या गोष्टींचे जाण असलेले एकमेव नेते फक्त शरद पवार हे आहेत. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात जे काही स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे. त्या स्फोटक वातावरणाला शांत करणे गरजेचे आहे. अन्यथा दोन्ही समाजाचे लोकांमध्ये वितुष्ट विकोपाला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी गेलो. तसेच मराठा-ओबीसी प्रश्नावर पुढाकार घ्यावा अशी विनंतीही केली असल्याचे स्पष्टीकरण दिले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांना यासंदर्भात सविस्तर ऐकून घेतले आणि सांगितले की, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी ते स्वतः बोलणार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील बैठकीसाठी ते सांगणार आहेत असेही यावेळी स्पष्ट करत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मी कोणाच्याही दारात जाऊ शकतो, वेळ पडली तर पंतप्रधान मोदी यांनाही भेटेन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही भेटण्यासाठी जाईन असेही सांगितले.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *