मुख्यमंत्री सुपुत्र खा. शिंदेही शिवतीर्थावर, नव्या युतीच्या चर्चेला उधाण

गणपती उस्तवात आणि त्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

श्रीकांत शिंदे हे मनसे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील कार्यालयात भेट दिल्याने युतीच्या चर्चेला उधाण आलं होते. त्यात आज २५ ऑक्टोंबर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात आहे. भेटीनंतर राज ठाकरे सपत्नीक श्रीकांत शिंदे यांना सोडण्यासाठी ‘शिवतीर्थ’च्या बाहेर आले होते. मात्र, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंशी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात नवी युती दिसण्याची चिन्ह आहेत.

डोंबिवलीतील कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले की, तुम्ही नवीन अर्थ काढू नका. मनसेच्या माध्यमातून दरवर्षी येथे लायटिंग तसेच वेगवेगळे कार्यक्रम फडके रोडला घेण्यात येतात. चांगलं चित्र बघायला मिळतंय आपल्याला, विरोधक एकत्र आल्याने चांगल्या गोष्टी होतात. दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र आहोत, कितीही विरोधक असलो तरी एकमेकांच्या सूचना, आक्षेप घेऊन पुढे जायचं असते, असे स्पष्ट केले.

श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या शहराध्यक्षाच्या विनंतीला मान देत कार्यालयाला भेट दिली. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी, दुश्मन नाही आहोत. शिंदे गट आणि भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतीत. स्वतंत्र निवडणूका लढण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. मात्र, त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *