Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएने दिली धमकी, बंडखोरांना विरोध का करता, अन्यथा जीवे मारू जळगांवच्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा आरोप

मागील १०-१२ दिवसांपासून शिवसेनेत बंडखोरी करत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचे प्रकरण आता न्यायालयात गेलेले असताना स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना विरूध्द एकनाथ शिंदे हा सामना थंड व्हायला तयार नाही. मात्र बंडखोर आमदारांना विरोध केला म्हणून दस्तुर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी स्वीय सहायक अर्थात पीएने चक्क शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला विरोध का करता, अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीवरून आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय साहाय्यकाने बंडखोर आमदारांना विरोध का करता? विरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याचा आरोप जळगाव शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला. जळगाव शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात शनिवारी २ जुलै रोजी मोर्चा काढला होता. यावेळी सभेदरम्यानच हा फोन आल्याचं गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

जळगावमध्ये बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी गुलाबराव वाघ यांना एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत आहे असे सांगितले. आमदारांना विरोध का करता? असा सवाल करत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे हा फोन सभेदरम्यानच आला होता. वाघ यांनी ज्या फोनवरून धमकी आली तो नंबरही माध्यमांना त्यांनी दाखवला.

त्यानंतर गुलाबराव वाघ म्हणाले की, आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. बंडखोरांविरोधात शिवसैनिक एकवटला आहे. शिवसैनिकांची एकजुट अशीच राहील. आम्ही यापुढेही बंडखोरांचा विरोध करू.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना हात जरी लागला तर जशास तसं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव वाघ यांनी धमकीच्या फोनची माहिती देतानाच याविरोधात जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं.

दरम्यान, जळगावमधून गुलाबराव पाटलांसह इतर आमदार शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. याविरोधातच जळगावमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *