मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवाराचा अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रिफ, मंत्री शंभुराज देसाई आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आणि एका मतदारसंघाची देखील नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे, असे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर आपण वेगळे लढत असलो तरी या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे करत भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारचे हात बळकट करायचे आहेत, असेही यावेळी सांगितले.

राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापुरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *