मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.

स्व. आशाताईंनी यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रीमती भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *