मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार, स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य

धारावी हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र आणि वैशिष्टपूर्ण उद्योग समूहाचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पूनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , तसेच संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी, यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  धारावीचा  पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करावया असून धारावीतील आर्थिक व्यवहार, व्यावसायिक उलाढाल   सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्राथिमकता देत या ठिकाणच्या  गुणवंत कारागिरांना, त्यांच्या कौशल्य आधारित विविध व्यवसायांच्या पुनवर्सनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. येथील मूळ रहिवाशी असलेल्या  प्रत्येकाला घर द्यायचं आहे. धारावी मधील प्रत्येकाला पूनर्वसन प्रकल्पात न्याय मिळाला पाहिजे, येथील प्रत्येक जण या पूर्नविकास प्रकल्पासाठी पात्र असणार आहे, त्याचे निकष वेगवेगळे असतील, मात्र धारावीतील प्रत्येकाला पूर्नवसनाचा लाभ मिळाला पाहिजे,  याची खबरादारी घेण्यात यावी.  ठरल्याप्रमाणे नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना विकास प्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी. धारावीची मूलभूत व्यावसायिक ओळख जपून,  मूळ वैशिष्ट्यांना सुरक्षित ठेऊन  धारावी विकास प्रकल्पाची  संकल्पना राबवावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय ठेवावा. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन लोकभावना जपून समन्वयपूर्वक विकासाची कामे करावीत,असे निर्दैश यावेळी यंत्रणांना दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांनी विकास प्रकल्पासाठी आवश्यक ती मान्यता, पुढील कार्यवाही तत्परतेने  करण्याचे निर्दैशित केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री (नगरविकास) कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता , प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त  एम एम आरडीए संजय मुखर्जी,  नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव  राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,  म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *