मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना ओएफसी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्याकडून एकमेकांच्या विरोधातच कुरघोडीचे राजकारण सुरु झाल्याचे दिसून येत असल्याने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारी एक महत्वपूर्ण नियोजित बैठक अचानकरित्या एकनाथ शिंदे यांनी अचानकरित्या रद्द केल्याची माहिती पुढे आली.
सध्या शिंदे गटाच्या शिवसेना व भाजपा यांच्यात आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री पदावरून सध्या घमासान सुरु आहे. त्यामुळे भाजपाच्या ताब्यातील नाशिकचे पालकमंत्री पद आणि रायगडचे पालकमंत्री पद जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे, त्याची मागणी मागील काही दिवसांपासून शिंदे यांच्या शिवसेनेकडून मागितले जात नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये एक प्रकारे विसंवाद निर्माण होत आहे.
त्यातच आज सोमवारी १० फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे निवासस्थानी सकाळी १० वाजताच पोहोचले आणि प्रदिर्घ चर्चेनंतर एक तासाने अर्थात ११ ते ११.३० वाजता राज ठाकरे यांच्या घरून बाहेर पडले. विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत तसहभागी कऱण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरु होत्या. मात्र मनसेचा समावेश महायुती होऊ शकला नाही. त्यातच यासंदर्भात भाजपा नेत्यांना यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना महायुतीत सहभागी करून घेता आले नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप भाजपाने केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्च ते मे या कालावधीत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. या निवडणूकीला महायुती म्हणून सामोरे जायचे की पुन्हा पक्षिय पातळीवर सामोरे जायचे याचा निर्णय अद्याप महायुतीत झालेला नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्षाची सारी मदार ही भाजपावर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची सारी राजकिय हालचाल त्या दृष्टीने सुरु आहे. इतक्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठक एकनाथ शिंदे यांची होणार होती. तर दुसरी बैठक एमएसआरडीसीच्या आढाव्यासंदर्भात होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार होती.
मात्र आज साकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवास्थानी पोहोचल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियोजित होणाऱ्या बैठकाच रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.
यासंदर्भात अजित पवार यांच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता, तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षखाली होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार होते. मात्र बैठक सुरु होण्याच्या काही काळ आधीच एकनाथ शिंदे यांना घशाचा त्रास होऊ लागल्याने अजित पवार यांच्यासोबतची आणि एमएसआरडीसीची होणारी नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Marathi e-Batmya