काल रात्री उशीराने नागपूरातील महाल परिसरात निर्माण झालेल्या दगडफेक, वाहने जाळण्याची घटना घडली. नागपूर शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच महाल परिसरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भाजपाचा म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून औरंगजेब यांच्यावरून भाजपाच्या मंत्र्याकडून आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून औरंगाबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवरून वाद निर्माण होत आहे. काल सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपूरमध्ये मोर्चा काढत औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी अशी मागणी करत निदर्शने केली. त्यानंतर दिवसभर नागपूरात याप्रश्नी शांतता होती. मात्र रात्री दोन गटात दगडफेकीच्या घटना घडली. तसेच वातावरण शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दंगेखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडली. यात काही पोलिस आणि नागरिक जखमी झाले.
राज्यातील मुख्यमंत्र्यांचेच शहरात अशा पद्धतीने दंगलीची परिस्थिती निर्माण झाल्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कालच टीकास्त्र सोडले. या प्रश्नी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले.
नागपूरातील दगडफेक प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस निवेदन करताना सांगितले, काल सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोर्चे काढत औरंगजेब यांची कबर काढून टाकण्याच्या घोषणा दिल्या. तसेच या मोर्चात एक प्रतिकृती तयार करण्यात आली आणि त्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर दिवसभर नागपूरात शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या निदर्शनावेळी तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीवर धार्मिक विद्वेष पसरविणारी लिखाण करण्यात आल्याचा मुद्दा काही जणांनी उपस्थित केला असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरम्यान, एखाद्या सुनियोजित कटाप्रमाणे रात्री दगडफेकीच्या घटनेला सुरुवात झाली. जवळपास ट्रॉलीभरून दगड सापडले. त्यामुळे ही संपूर्ण घटना सुयोनियोजित कटाचा भाग वाटते. काही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेत एका डिसीपीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. एका पोलिसाचा पाय फ्रक्चर झाला असून जवळपास ५ पोलिस जखमी झालेले आहेत. तर तीन नागरिक जखमी झाले असून तीघांपैकी २ दोघांना घरी सोडण्यात आले आहे. तर एक जण अति गंभीर आहे. त्यास आयसीयुत दाखल करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
याप्रकरणी निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि हल्ला केला. जे पोलिस शांतता पुर्नस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. ही अशी दुर्दैवी बाब आहे. अशा हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येणार तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनाना करण्यात येत आहे. नागपूरातील घटनेचे प्रतिसाद इतर ठिकाणी उटू नयेत यासाठी राज्यातील पोलिस दलाला आदेश देण्यात आलेले आहेत. तर नागपूरात मोठ्या प्रमाणावर एसआरपीच्या तुकडया तैनात करण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून पुन्हा एकदा दफडफेक आणि जाळपोळीची घटना होणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विशेषतः औरंगजेबाची माहिती आणि किंवा संभाजी महाराजांच्या खरा इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला आहे. त्यामुळे या औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याबाबतच्या भावना मोर्चे-निर्देशानात पुढे आली आहे. मात्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत उत्सुर्फ प्रक्रिया उमटत आहे.
दरम्यान, छावा चित्रपटाच्या सुरुवातीलाच छावा कांदबरीवर आधारीत हा चित्रपट असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच ज्यावेळी ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यावेळी छावा कांदबरी ही ऐतिहासीक घटनांचा गस्तावेज नसून काल्पनिक कथानक असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसा उल्लेखही चित्रपटाच्या सुरुवातीला जाहिर करण्यात आले. तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छावा चित्रपटातून खरा इतिहास बाहेर आल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काल्पनिक गोष्टींना खरे असल्याचे कधीपासून मानू लागले असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
My statement in Maharashtra Legislative Assembly on yesterday's #Nagpur incident.
दि. 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने विधानसभेत निवेदन…(विधानसभा, मुंबई | दि. 18 मार्च 2025) #Maharashtra #MahaBudgetSession2025 pic.twitter.com/MMXlfDiGxp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 18, 2025
Marathi e-Batmya