Breaking News

कॉम्रेड सीताराम येचुरी रूग्णालयात, प्रकृती चिंताजनक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

देशातील काँग्रेसच्या नेकृत्वाखालील युपीए १ आणि २ च्या काळात कॉम्रेड सीताराम येचुरी यांची भूमिका प्रामुख्याने महत्वाची ठरली होती. मात्र कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या आजारामुळे दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येचुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाच्यावतीने देण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये सांगण्यात आले.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी, यांना गेल्या महिन्यात दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते, त्यांना मागील महिन्यापासून श्वसनाचा त्रास होत होता, असे पक्षाने एका निवेदनात सांगितले.

सीपीआय(एम) ने एका निवेदनात म्हटले आहे की सीताराम येचुरी यांना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे आणि श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्याची प्रकृती चिंताजनक असून जीवनाश्वक सपोर्टवर ठेवण्यात आले असून एम्समधील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचेही यावेळी सांगितले.

सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी खूप ताप आल्याने एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका सूत्राचा हवाला देऊन सांगितले की, त्यांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यात काहीही गंभीर नाही.

सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी यांच्यावर नुकतीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Check Also

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *