संजय राऊत म्हणाले, तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना या मित्र पक्षांची अडचण झाली आहे. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होऊ शकते असे स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिले.

या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झाली. शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका दोन्ही विरुद्ध टोक असल्यामुळे मविआत अस्वस्था असल्याचे बोलले जात आहे.

खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण झाली. त्यामुळे ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सावरकरांच्या बाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
विनायक दामोदर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य  शिवसेनेला मान्य नाही. सावरकर महाराष्ट्रासाठी देशासाठी आदर आणि श्रद्धेचे आहेत विशेषता आमच्यासाठी,ते आदरच आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भारत जोडो यात्रेत हा अजेंडा नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार, सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

ठाकरे गटाने आता सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही,अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा झाल्याचे बोलले जाते.

मनसे-भाजपचं ढोंग दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर बुलडाण्यात जाऊन, राहुल गांधींच्या शेगावातील सभेत निषेध नोंदवण्याचा निर्धार केला. तर इकडे मुंबई, पुणे ठाण्यात भाजपने रस्त्यावर उतरुन राहुल गांधींचा निषेध केला. मात्र मनसे-भाजप रस्त्यावर उतरले हे ढोंग आहे. राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकरांवरून रस्त्यावर उतरण्याचं काहींचं काम सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *