विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र कोल्हापूर उत्तर मधून खासदार शाहु महाराज घाटगे यांच्या स्नुषा तथा मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमा घाटगे यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांना नेत्यांना याची कल्पना दिली का किंवा त्यांच्याशी याबाबत सल्ला मसलत केली का अशी विचारणा करण्यात आली. मात्र मधुरिमा घाटगे यांनी अचानक काही कारणास्तव उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खासदार शाहु महाराज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
मात्र मधुरिमा राजे घाटगे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
मात्र मधुरिमा घाटगे यांच्या उमेदवारीमुळे कोल्हापूर काँग्रेचे नेते सतेज बंटी पाटील हे भलतेच नाराज झाले असल्याची चर्चा कोल्हापूरात रंगली आहे. तर महाविकास आघाडीकडून बंडखोर उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेस-महाविकास आघाडीने पाठिंबा देत त्यांना कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मात्र मधुरिमाराजे घाटगे यांच्या उमेदवारीमुळे घाटगे घराण्यात वाद-विवाद झाल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली असून विशेषतः छत्रपती संभाजी राजे आणि खासदार शाहु महाराज यांच्या प्रचंड वाद विवाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या वादात खासदार शाहु महाराज यांचे पुत्र मालोजीराजे आणि मधुरिमा घाटगे यांच्यातही वाद निर्माण झाल्याने अखेर या घरातील भाऊ बंदकीत मधुरिमा राजे घाटगे यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात झाल्याचे बोलले जात आहे.
एकाबाजूला छत्रपती संभाजी राजे आणि स्वराज्य पक्षाची स्थापना करून बच्चू कडू यांच्या पक्षाशी युती करत तिसरी आघाडीची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला छत्रपती या शाहु महाराज आणि मधुरिमा घाटगे हे विरोधक महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षात गेल्याचे दिसत असल्यामुळे राज्यातील जनतेत वेगळा संदेश जात आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या राजकिय जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर एकाच घरात इतके विविध राजकिय विचार असा विरोधाभास निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय कोल्हापूराचे काँग्रेस नेते सतेज बंटी पाटील आणि खासदार शाहु महाराज यांच्यात मधुरिमाराजे घाटगे यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी सतेज बंटी पाटील यांनी हिम्मत नव्हती तर कशाला उमेदवारी अर्ज भरला अशी विचारणा केली. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सांगायचे ना असे सांगत यापूर्वीच राजेश लाटकर यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगून त्यांनाच मदत केली असती असेही खासदार शाहु महाराज यांना बोलल्याचे समजते.
Marathi e-Batmya