Breaking News

काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

भाजपमधील कारभाराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई नगराळे यांची राज्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले.

भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रसमध्ये प्रवेश करण्याचे संकेतही दिले. त्यानुसार त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश ही केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या ठिकाणी पटोले यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना कोणते पद दिले जाणार याविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागून राहीली होती. अखेर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जर्नादन दिवेदी यांनी आज पटोले यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्रक काढले. त्यांच्याबरोबर दलित समाजातील माजी आयएएस अधिकारी भाई नगराळे यांचीही प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत