काँग्रेस पक्षाची सोमवार ३० मार्चला सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार आहेत. पदयात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून सकाळी ८ वाजता होणार असून संध्याकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे.

भाजपा सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाजपा सरकारच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत.भाजपा सरकार एमएसपीचा कायदाही करत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणाही भाजपा सरकारने केल्या पण त्याही कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, तर मोदी सरकारने अमेरिकेबरोबर व्यापारी करार करून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस संसद, विधिमंडळ व रस्त्यावरही लढत असून, या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.

About Editor

Check Also

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या रात्रीपर्यंत राजीनामा ? व्हिडिओचे सत्य समोर आल्यानंतरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *